प्रदूषण नियंत्रणासह, पट्टे वाटप मंदिर विकास, पुतळा उभारणी व पायाभूत कामांना गती द्या – आ. किशोर जोरगेवार

 



प्रदूषण नियंत्रणासह, पट्टे वाटप मंदिर विकास, पुतळा उभारणी व पायाभूत कामांना गती द्या – आ. किशोर जोरगेवार

◾जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, कोल वॉशरीच्या प्रदूषणामुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला द्या

 


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात मार्गी लागले पाहिजेत. नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. बेलसनी येथील कोल वॉशरीच्या प्रदूषणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला, श्री माता महाकाली मंदिराला ब दर्जा व मंदिर विकास, चैत्र नवरात्र यात्रेतील सोयीसुविधा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी, विपश्यना केंद्र, पट्टे वाटप तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

शुक्रवारी मतदारसंघातील विविध विषयांबाबत आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संबंधित विभागांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर मनपा आयुक्त नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक भुमरेड्डी गिज्जेवार, कृषी अधीक्षक तोटावार, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, चंद्रपूर मनपाचे उपायुक्त संदीप चिद्रावार, शेषराव टाले,  शहर अभियंता रविंद्र हजारे, राज्य परिवहन बिभागाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपाचे जिल्हा संघटक महामंत्री नामदेव दाहूले, बेलसनीच्या सरपंच इंदिरा कोल्हे, उपसरपंच मंगेश लोढे, सदस्य गौरव गोहणे, अमोल मोहितकर, सुरज विधाते, किसान आघाडीचे शंकर विधाते, माता महाकाली मंदिराचे विश्वस्त मोहन महाकाले, महाकाली महोत्सव ट्रस्ट चे विश्वस्त श्याम धोपटे, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, मिलिंद गंपावार, तुषार सोम, सविता दंडारे वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, रवी गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, शेखर शेट्टी, सायली येरणे, स्वप्नील डुकरे, नगरसेवक जितेश कुळमेथे, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, रॉबिन बिश्वास, नीतेश गवळे, भालचंद्र दानव, सरला कुळसंगे, ज्योती जीवने, अनुजा तायडे, आशा देशमुख, आशीष माशीरकर, रामकुमार आक्कापेल्ली, सुमित बेले, राकेश नाकाडे, राम जंगम, चंद्रशेखर देशमुख, सतीश तायडे आदींची उपस्थिती होती

श्री माता महाकाली मंदिर परिसर विकासासंदर्भातील प्रस्तावातील त्रुटी तात्काळ दूर करून सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून कामांना गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पात्र लाभार्थ्यांना त्वरित पट्टे वितरित करावेत. ‘लॉक ’ उल्लेख असलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्रुटी दुरुस्त कराव्यात व नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यानी सांगितले.

बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे विपश्यना केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचा विषय जनभावनेशी निगडित असल्याने निधीची तरतूद करावी आणि पोलिस विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

घुग्घुस परिसरातील कोळसा धूळप्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बेलसनी येथील महामाया कोल वॉशरीच्या धुळामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नुकसान झाले, ३ महिन्यापासून गावकरी तक्रार करीत आहे परंतु कंपनी आणि प्रदूषण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावकारांच्या शेतात व अंगणात कोळशाच्या धुळीचा थर साचत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतपिकांच्या गुणवत्तेवर परिणाम पडत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे धुळीचा प्रदूषण तात्काळ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचा सूचना केल्या  

प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत संबंधित कंपनीचे काम तात्काळ बंद करावे. बाधित शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी व्हील वॉशिंग सिस्टीम बंधनकारक करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील महसूल विभागाच्या जागेवर इनडोअर-आउटडोअर स्टेडियम उभारणी, ग्रामपंचायतींना ‘रेव्हेन्यू व्हिलेज’ दर्जा देणे, ईरई नदीवरील पूरसंरक्षण भिंत उभारणी तसेच सातबारा उताऱ्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर या विषयांवर संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करून कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करत निश्चित कालमर्यादेत अहवाल सादर करावा. विकासकामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांच्या प्रश्नांवर वेळेत निर्णय घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments