शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात शेतकरी / नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यात येणार
◾बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व नागरिकांना दैनंदिन प्रश्नांचे निराकरण
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्व सामान्य जनता, शेतकरी, विध्यार्धी व महिला यांचे महसूल विभागाशी समबंधीत दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे उद्देशाने बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे दि.27 फेब्रुवारी, कोठारी येथे दि.28 फेब्रुवारी , कळमना येथे दि.2 मार्च, कवडजई येथे दि.4 मार्च, विसापूर येथे दि.5 मार्च, 2026 रोजी, नांदगाव पोडे आणि बामणी येथे दि.6 मार्च रोजी संवाद यात्रा काढण्यात येणार असून शेतकरी, नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत.
संवाद यात्रेमध्ये नागरिकांनी त्यांचे अर्ज सादर करावेत. संवाद यात्रेमध्ये प्राप्त अर्ज कोठारी येथे दि.7 मार्च 2026 रोजी व विसापूर येथे दि.14 मार्च 2026 रोजी आयोजित समाधान शिबिरामध्ये निराकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरामध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा असे, तहसीलदार बल्लारपूर यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.







0 Comments