सैनिक कल्याण विभागांतर्गत लिपीक टंकलेखक पदाची परीक्षा 14 मार्च रोजी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखलील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट - क) च्या एकूण 72 पदांकरीता टीसीएस – आयओएन यांच्या मार्फत 14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.






0 Comments