आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कळमना येथे साकारले आधुनिक ‘स्मार्ट’ प्राथमिक आरोग्य केंद्र
◾दि. १० नोव्हेंबरला आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
◾कळमनावासीयांना मिळणार अद्ययावत आरोग्यसेवा
शुभेच्छा : मा.जैनुद्दीन जेव्हेरी जन्मदिन ( विज्ञापन )
मा.जैनुद्दीन जेव्हेरी जन्मदिन
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे साकारलेला आणखी एक लोकहितकारी प्रकल्प आता जनतेच्या सेवेस सज्ज झाला आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाला नेहमीच प्राधान्य देणारे आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्मार्ट इमारतीची उभारणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा हा आणखी एक ठोस पुरावा आहे. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, याच एकमात्र हेतूने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे जाळे निर्माण केले. यात बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निमित्ताने नवा अध्याय जोडला जाणार आहे. अलीकडेच आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेले पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांच्या सेवेत दाखल झाले. आणि आता कळमनावासीयांना देखील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निमित्ताने अद्ययावत आरोग्यसेवा मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल. आपल्या भागात आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे स्मार्ट आरोग्य केंद्र सुरू होत असल्याचा उत्साह स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपुरात आरोग्य सुविधांची क्रांती
उत्तम वैद्यकीय सुविधा मिळणे हा जनतेचा अधिकार आहे, असे मानून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी यांच्याकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी एमआरआय मशीनसाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी आणला, १.५ कोटी रुपयांची मोबाईल कॅन्सर व्हॅन, जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ३२ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ स्मार्ट रुग्णालय, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल उभारणी करण्यासोबत नेत्र व आरोग्य शिबिरे राबवून हजारो नागरिकांना दिलासा दिला आहे. “आरोग्यदायी चंद्रपूर” हा त्यांचा संकल्प त्यांनी कायम प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे, हे विशेष.









0 Comments