बिहार विजयाने देशाची विकास यात्रा आणखी वेगवान होईल – आ. किशोर जोरगेवार

 





बिहार विजयाने देशाची विकास यात्रा आणखी वेगवान होईल – आ. किशोर जोरगेवार

◾बिहारच्या भव्य विजय निमित्त गांधी चौकात भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने जल्लोष; पडोली आणि घुग्घूस येथेही जल्लोष

 चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बिहार विधानसभेतील एन.डी.ए. गटबंधनच्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात लाडू वाटप करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, महामंत्री रवींद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अॅड. सारिका संदुरकर, युवा मोर्चा महिला महामंत्री सायली येरणे, पुष्पा उराडे, प्रज्ञा बोरगमवार, वंदना तिखे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, कौसर खान, आदिवासी आघाडी अध्यक्ष जितेश कुळमेथे, अमोल शेंडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, अरुण तिखे, देवानंद वाढई, विठ्ठल डुकरे, शितल आश्रम, राजेंद्र अडपेवार, भाग्यश्री हांडे, मुग्धा खांडे, राकेश बोमनवार, सुदामा यादव, उग्रसेन पांडे, रंजन ठाकुर, शेखर शेट्टी, जयश्री आश्रम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे. बिहारमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा विजय नाही, तर तो देशातील सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा, विकासाच्या दिशेने जात असलेल्या राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीचा विजय आहे.

भारतामध्ये विकास, सुशासन आणि पारदर्शक नेतृत्वालाच जनतेचा आशीर्वाद मिळतो, हे बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आज चंद्रपूरमध्ये आपण जल्लोष करत असलो तरी हा जल्लोष आपल्या विचारांचा, आपल्या राष्ट्रनिष्ठेचा आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या समर्पित परिश्रमांचा सुद्धा आहे. बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या अपार विश्वासाचा पुरावा आहे. मोदीजींनी देशाला विकासाच्या नवीन वाटा दाखवल्या, गरीब कल्याणाच्या योजना घराघरात पोहोचवल्या आणि देशात नवी ऊर्जा निर्माण केली. त्या ऊर्जेचे प्रतिबिंब बिहारमध्ये स्पष्टपणे दिसून आले.ना. अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकार्यातील दृढनिश्चयी नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून, ढोल-ताश्याच्या गजरात मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.




Post a Comment

0 Comments