मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे बालक दिन साजरा
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच मीना शेंडे मॅडम, जोशी मॅडम,रिता मॅडम, यांनी विद्येची आराध्य देवता सरस्वती माता तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले.
सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालक दिनाचे महत्त्व सांगितले. रेवती मेनकुदळे मॅडम यांनी सुद्धा चाचा नेहरू विषयी विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी संजय ठोंबरे सर यांनी तारे जमीन पर या चित्रपटामधील बम बम बोले गाण्यावर डान्स करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. त्यानंतर मीना शेंडे, मॅडम सीमा धावडे मॅडम, शबाना मॅडम सरिता मॅडम, वनिता मॅडम यांनी मी काही अभ्यास केला नाही या गाण्यावर ग्रुप डान्स केला. तसेच रिता मॅडम, मनीषा मॅडम, किसान मॅडम, मेनकुदळे मॅडम यांनी बालगीता वर आधारित ग्रुप डान्स केला.
शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी चंदा चमके चम चम या गाण्यावर सोलो डान्स केला. पवार सर, चौधरी सर, संजय ठोंबरे सर, प्रशांत बनकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी संगीत नाट्य केले. लता शेंडे मॅडम यांनी जीवनाचा आनंद हे गीत गायले व सुरावर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पहेलिया सांगितल्या. त्यानंतर तुषार चौधरी सर व संजय ठोंबरे सर यांनी मॅजिक दाखवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. मीना मॅडम यांनी जिंदगी एक नही जंग तसेच सुनीता मॅडम यांनी गाणे म्हटले तसेच ज्ञानेश्वर पवार सर यांनी चाचा नेहरू यांच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांना आकर्षित केले. वनिता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालकथा सांगितली व यानंतर तुषार चौधरी सर, बनकर सर, संजय ठोंबरे सर यांनी हास्य नाट्य करून कार्यक्रमाची सांगता केली. संचालन किसान मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन बनकर सर यांनी केले. या बालक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.









0 Comments