राजुरा शहरातील सोनिया नगरमधील नागरिकांना आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते पट्टे वाटप



राजुरा शहरातील सोनिया नगरमधील नागरिकांना आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते पट्टे वाटप

◾आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश; बहुप्रतिक्षित मागणीची पूर्तता

राकेश कलेगुरवार ( ता. प्रतिनिधी ) :

राजुरा,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सोनिया नगर येथील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मालकी हक्काची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते (दि.३) ला सोनिया नगरमधील १५२ अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात आले. या पट्टे वाटपामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमात बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले, “सामान्य नागरिकांना आपल्या घराचा कायदेशीर हक्क मिळावा, ही माझी प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे प्रत्येक नागरिकांना लाभ मिळणे आवश्यक आहे. सोनिया नगरमधील नागरिकांचा हा बहुप्रतिक्षित प्रश्न आज सुटला असून त्यांना हक्काची जागा मिळाल्याने नागरिकांची अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

सोनिया नगर परिसरात अनेक वर्षांपासून राहणारे नागरिक अतिक्रमण धारक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या घरांना अधिकृत मालकी हक्क नसल्याने अनेक शासकीय सुविधा व योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. आता पट्टे मिळाल्यामुळे या नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गोंड , मुख्याधिकारी विवेक चौधरी, भूमी अभिलेख उपअधिक्षक सोनावणे, भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री मिलिंद देशकर, शहर महामंत्री सचिन भोयर, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, विनोद नरेंदुलवार, माजी नगराध्यक्षा उज्वला जयपूरकर, महामंत्री लक्ष्मी बिस्वास ,प्रियदर्शनी उमरे,अश्विनी कोकाटे, रवी लेकलवार, आकाश गंधारे, महेश झाडे, महेंद्र बुरटकर, अभिजित कोंडावार, मंगल चव्हाण, तुषार कोरटे,सलमान खान, श्रीकांत चिट्टलवार, नितीन सिडाम, सचिन भटारकर ,आनंद सिडाम, राकेश आदे ,अनिल आत्राम,उमेश गोरे, प्रणव मसादे ,अतुल प्रेमलवार, शैलेश मोहनकर  यांचेसह भाजपा कार्यकर्ते व सोनिया नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments