Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याबाबत व 3.2 रिश्टर चे भूकंप
◾भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान न झाल्या
◾चंद्रपूरकरांसाठी प्रशासनाचं महत्वाचं अपडेट
चंद्रपुर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती 'सेसमिक स्टडी ऑफ इंडिया' या भूकंप अॅपवर दिसली. Chandrapur Warora Earthquake Update
यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे. ह्या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याबाबत व 3.2 रिश्टर चे भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप app द्वारे प्राप्त झाली, त्याच वेळी वरोरा परिसरातील नागरिक विशेषतः मार्दा, एकोना गावातील नागरिक , पोलीस पाटील , तलाठी त्यांच्यामार्फत खात्री केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले.
तसेच सदरील परिसरात वेकोली खदान व्यवस्थापनाकडून हि खात्री केलेली आहे, सदरील नोंद झालेल्या भूकंपाच्या घटनेत सध्या तरी कोणतेही नुकसान न झाल्याचे माहिती प्राप्त आहे.
(आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून प्राप्त माहिती)
0 Comments