राष्ट्रीय परिषदेत चंद्रपूर जिल्ह्याची नवकल्पना जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर

 



राष्ट्रीय परिषदेत चंद्रपूर जिल्ह्याची नवकल्पना  जिल्हाधिकाऱ्यांकडून सादर

 ◾बळिराजा समृद्धी मार्ग अभियान – 5001 कि.मी



चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘बळिराजा समृद्धी मार्ग अभियान – 5001 कि.मी.’ याचे सादरीकरण, कार्मिक व सार्वजनिक तक्रारी विभाग, भारत सरकारतर्फे पाटणा येथे आयोजित संपूर्ण जिल्हा विकास या राष्ट्रीय परिषदेत केले.

हा उपक्रम पंतप्रधान उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार 2023-24 साठी निवडलेल्या नाविन्यपूर्ण योजनांपैकी एक असून, चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांत 5001 कि.मी. ग्रामीण शेतरस्ते बांधण्यावर आधारित आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठा व आवश्यक सेवांपर्यंत सर्व हंगामात रस्ते संपर्क मिळून उत्पन्नवाढ व जीवनमान सुधारणा साध्य होत आहे.

अभियानाची वैशिष्ट्ये :

1. निधी एकत्रिकरण : मनरेगा व जिल्हा खनिज निधी (पीएमकेकेकेवाय) द्वारे अंमलबजावणी.

2. शेतकरी-केंद्रित नियोजन : रस्त्यांची निवड ग्रामसभांद्वारे.

 3. रोजगार निर्मिती : आतापर्यंत 75 लाख मनुष्यबळाहून अधिक मजुरी उपलब्ध

            4. थेट लाभार्थी : सुमारे 1 लाख शेतकरी, त्यापैकी 48 हजार शेतकरी आधीच लाभान्वित.

अभियानाचा प्रभाव : या उपक्रमामुळे 1. पिकानंतरचे नुकसान व वाहतूक खर्च कमी झाले. 2. शेतीची जमीन व कृषी यांत्रिकीकरणाचे मूल्य वाढले. 3. ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत झाल्या व हंगामी स्थलांतर कमी झाले. 4. आरोग्य, शिक्षण व पोषण क्षेत्रातही सकारात्मक परिणाम दिसून आले.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘बळिराजा समृद्धी मार्ग अभियान’ केवळ रस्तेबांधणी नाही  तर शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे, समृद्धी पोहोचविण्याचे आणि समुदाय-आधारित विकासाचे राष्ट्रीय स्तरावर विस्तारता येणारे मॉडेल आहे. या राष्ट्रीय मान्यतेमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव ग्रामीण परिवर्तनासाठी एक आदर्श व पुनरुत्पादक आराखडा म्हणून समोर आला आहे.




Post a Comment

0 Comments