चिमूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात प्रवेश दिन

 





चिमूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात प्रवेश दिन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून प्रवेश दिन साजरा करण्यात आला.

संस्थेचे प्राचार्य प्रणाली दहाटे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे निदेशक श्री. पावडे यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीची तसेच रोजगाराच्या संधीबाबत प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिली. संस्थेचे निदेशक श्री. दरवळकर यांनी प्रशिक्षणार्थींना संस्थेची शिस्त, कार्यपद्धती, कार्यशाळा व संसाधने यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित असलेले निदेशक श्री.गंगावणे यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या वर्षभरातील सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाप्रसंगी प्रवेशित काही प्रशिक्षणार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या गटनिदेशिका बलकी मॅडम, तायडे मॅडम, पत्तीवार मॅडम, श्री. बारसागडे, श्री. सोनुने, श्री. ढोले आदींनी संस्थेच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्री. भेंडारकर यांनी तर आभार श्री. किनेकर यांनी मानले. यावेळी  सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments