बल्लारापूर येथील अल्पवायीन रंजित निषाद पाच दिवसापासून गायब त्याचा शोध घ्या; सिआयडी चौकशीची मागणी

 








बल्लारापूर येथील अल्पवायीन रंजित निषाद पाच दिवसापासून गायब त्याचा शोध घ्या; सिआयडी चौकशीची मागणी

◾बल्लारापूर रहिवासी आपल्या 7 मित्रांसोबत बाहेर गेला तेंव्हापासून तो परत आला नाही

◾परिवाराची सिआयडी चौकशीची पत्रकारपरिषदेतून पोलीस प्रशासनाकडे मागणी  

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारापूर येथील अल्पवयीन युवक रंजित निषाद मागील पाच दिवसापासून राजुरा तालुक्यातील गौरी सास्ती परिसरातील गुप्ता कोल वाशरी वेकोली परिसरातून मित्रांसोबत रात्रीला गेल्यानंतर गायब झाल्याने व तो परत आला नसल्याने त्याचा घातपात झाला असावा अशी शंका घेत मुलाच्या परिवाराकडून पत्रकार परिषद घेऊन आमच्या मुलाच्या शोध पोलिसांनी त्वरित घ्यावा अथवा सिआयडी मार्फत तपास करून आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाँधे, सुनील गुढे व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

राजुरा तालुक्यातील बावापूर, कडोली, मानोली व कोलगाव परिवारात गुप्ता वाशरी व वेकोली च्या कोलशा खाणी आहेत तिथे ट्रान्सपोर्ट च्या गाड्यामधून रात्रीच्या वेळी कित्तेक वेळा गाड्यांच्या बॅटऱ्या व गाडीमधून डिझेल चोरी होतं असतें. अशातच दिनांक 8/8/2025 ला रात्री 11.30 वाजता रंजित निषाद उर्फ कट्टनी वय 17 वर्ष हा बल्लारापूर रहिवासी आपल्या 7 मित्रांसोबत बाहेर गेला तेंव्हापासून तो परत आला नाही  दरम्यान दुसऱ्या दिवशी रंजित सोबत गेलेले युवक राजुरा पोलीसांनीनी चोरीच्या गुन्ह्यात पकडले परंतु रंजित निषाद ला पकडले नाही तर त्याचा मोबाईल दाऊद नावाच्या मुलांनी राजुरा पोलिसांकडे जमा केला.

 यावरून रंजित चा सोबत असलेल्या युवकांनी घापात केला असावा अशी परिवाराची शंका असून आमच्या मुलाचा पोलिसांनी शोध लावून आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी गायब झालेल्या रंजितची आई राजाराणी वडील दिनेश निषाद व भाऊ संजय निषाद यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.




Post a Comment

0 Comments