हवामान इशारा चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाट होण्याची शक्यता

 








हवामान इशारा चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाट होण्याची शक्यता

◾प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर (भारतीय हवामान विभाग) तात्काळ हवामान इशारा

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक  13/08/2025 बुधवारी रोज वेळ : 10:00 वाजता IST वैधता : पुढील 3 तासचंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाट होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी, चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी, तर अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिशय हलका ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

 कृपया काळजी घ्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर (भारतीय हवामान विभाग).




Post a Comment

0 Comments