चंद्रपूर शहर हद्दीतील महाकाली कॉलरी,आनंदनगर परिसरात अवैधरित्या मोहा दारु काढणाऱ्यांना ८ महिलांना अटक








चंद्रपूर शहर हद्दीतील महाकाली कॉलरी,आनंदनगर परिसरात अवैधरित्या मोहा दारु काढणाऱ्यांना  ८ महिलांना अटक

◾मोहा दारु, मोहा सडवा व इतर असा एकुण १,४१,४६०/- रु. चा मुद्देमाल जप्त

◾पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कार्यवाही

 चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ०५/०८/२०२५ रोजी पोस्टे चंद्रपूर शहर येथील गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार पो.स्टे. परिसरात वॉश ऑऊट मोहीम पेट्रोलींग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, महाकाली कॉलरी आनंदनगर चंद्रपूर येथे काही घरात मोहा सडवा, मोहा दारू, देशी दारू बाळगुन विक्री करीत असल्याचे माहितीवरुन चंद्रपूर शहर पोलीस, पंच, वजन मापधारक, फोटोग्राफर सह घटनास्थळी कारवाई करणे करीता पोहचले असता,काही महीलांचे राहते घरी मोहा सडवा,मोहा दारू,देशी दारू मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष कायदेशीररित्या घराची घरझडती घेतली असता, आरोपी नामे क्र. १) लक्ष्मी अशोक दहागावकर वय ४६ वर्ष, (२) कांता प्रकाश चापडे वय ५६ वर्ष, (३) छाया शंकर दुर्गे वय ५० वर्ष, (४) तुळशी दिपक मेश्राम वय ३७ वर्ष, (५) शशीकला त्रिमोहन बुटले वय ४१ वर्ष, (६) माया लक्ष्मण दुर्गे वय ५८ वर्ष, (७) मोनिका विजय दुर्गे वय ३६ वर्ष, (८) सुशिला मुरलीधर ठाकरे, वय ६० वर्ष यांच्याकडे (१) मोहा दारू ४८५ लि. प्र.लि. ७० रू. प्रमाणे किंमत ३३,९५०/-रू. (२) मोहा सडवा १२८० लि.प्र.लि ५० रू. प्रमाणे किंमत ६४,०००/- रू. (३) मोहा दारू काढण्याकरीता वापरण्यात आलेले ईतर साहित्य किंमत ४२, १५० रू. आणि (४) एकुण ३४ नग ९० एम.एल नी भरलेल्या देशी दारूच्या प्लास्टीक शिश्या प्रत्येकी ४० रूपये प्रमाणे किंमत १३६०/-रूपये असा एकुण १,४१,४६०/-रूपये चा मु‌द्देमाल जप्त करण्यात येवुन आरोपी महिलांविरुध्द दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात पोउपनि. मनिष तालेवार, वैभव चव्हाण, म.पो. हवा. भावना रामटेके, पो.हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, ईमरान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, मल्लेश नरगेवार, प्रविण रामटेके नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे.




Post a Comment

0 Comments