गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीतांना तसेच त्यांना पळुन जाण्यास सहाय्य करणाऱ्या इसमासह एकुण ३ आरोपी अटक
◾पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची संयुक्त कामगिरी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ३०/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील जुनोना चौक परिसरात बुधासिंग टाक याचे गोळीबार मध्ये झालेल्या हत्ये संदर्भात फिर्यादी राकेश गौतम तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ६१५/२०२५ कलम १०३ (१) ३ (५) भारतीस न्याय संहिता-२०२३ सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गोळीबार मध्ये झालेल्या हत्ये संदर्भात फिर्यादी राकेश गौतम तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ६१५/२०२५ कलम १०३ (१) ३ (५) भारतीस न्याय संहिता-२०२३ सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी हे गुन्हा करुन फरार झाले होते, प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे वेगवेगळे शोध पथके तयार करुन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी तंत्रबध्द कौशल्यपूर्ण सखोल तपास करुन अथक परिश्रम घेवुन गुन्हयातील मुख्य आरोपी नामे सोनुसिंग जितसिंग टाक रा. जुनोना चौक, बाबुपेठ चंद्रपूर तसेच त्याचा साथीदार नामे लाला उर्फ नैनेश सहा रा. फुले चौक बाबुपेठ चंद्रपूर आणि सदर आरोपीतांना पळुन जाण्यासाठी सहाय्य करणारा इसम नामे पवन पाटील रा. फुले चौक बाबुपेठ यांना शिताफीने अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन रामनगर आणि सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
0 Comments