बनावट रॉकेट देशी दारु आणि पिकअप वाहन असा एकुण 21,15,000/- रु. चा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटक
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : यवतमाळ जिल्हयातून वरोरा मार्गे दारुबंदी जिल्हा वर्धा येथुन अवैध दारुची वाहतुक पिकअप वाहनाने होणार आहे अशी गुप्त माहिती ने चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पेट्रोलींग करीत असतांना अवैधरित्या बनावट देशी दारु वाहतुक करणाऱ्याइसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक आरोपी अटक, बनावट रॉकेट देशी दारु आणि पिकअप वाहन असा एकुण 21,15,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
यावरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी केली असता मौजा माढेळी वरोरा रोडवरील नाकाबंदी पॉईन्टवर एक पिकअप वाहन क्रमांक MH27-X-8210 येतांना दिसल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये शेपूच्या भाजीचे कॅरेट मध्ये लपवुन ठेवलेले बनावट रॉकेट देशी दारुचे 90 mL च्या एकुण 150 पेटया किंमत 6,00,000/- रु मिळुन आल्याने सदर देशी दारु आणि गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन किंमत 15,00,000/- रु. व आरोपीचा मोबाईल असा एकुण 21,15,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपी वाहन चालक नामे सागर अशोक परदेशी वय 27 वर्ष रा. भडगांव ता. चाळीसगांव जि. जळगाव यास अटक करुन त्याचे आणि पाहीजे असलेले आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक 480/2025 कलम 123,316,318,340,49 भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम 65 (ए) (ई), 83, 90 महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं किशोर वाकाटे, नितीन रायपुरे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, संतोष येलपुलवार, सचिन गुरनुले, नितीन कुरेकार, मिलींद जांभुळे, चेतन गज्जलवार, प्रफुल्ल गारगाटे, दिनेश अराडे, मिलींद टेकाम, रिक्षब बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
0 Comments