OYO ब्रॉण्ड व लोगो बनावट बनवुन त्याचा दुरुपयोग करुन व्यवसाय करणारे चालक/मालकांविरुध्द गुन्हा नोंद

 



OYO ब्रॉण्ड व लोगो बनावट बनवुन त्याचा दुरुपयोग करुन व्यवसाय करणारे चालक/मालकांविरुध्द गुन्हा नोंद 

◾OYO ब्रॉण्ड आणि Logo चा दुरुपयोग करुन व्यवसाय करणारे हॉटेल/लॉजेस चालक/मालकांविरुध्द गुन्हा नोंद 

◾पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कार्यवाही

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक १८/०७/२०२५ रोजी फिर्यादी श्री. मनोज माणिक पाटील, ओयो-नोडल अधिकारी अहमदाबाद यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे लेखी रिपोर्ट दिला की, OYO Hotel & Homes Pri. Ltd. 1/- ही कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असुन OYO ROOMS ट्रेडमार्क व्यापार चिन्हा अधिनियम १९९९ प्रमाणे व्यापार चिन्ह रजिस्टर झालेली आहे. 

ओयो हॉटेल हे बजेट लॉजिंग बुक करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्म आहे. चंद्रपूर जिल्हयात ओयो कंपनीचा OYO ब्रॉण्ड व लोगो बनावट बनवुन त्याचा दुरुपयोग करुन व्यवसाय करणारे हॉटेल/लॉजेस भरपुर असल्याच्या तक्रारी त्यांच्या कंपनीला प्राप्त झाल्याने ते दि. १७/७/२०२५ रोजी चंद्रपूर शहरात भेट देवुन गोपनियरित्या माहिती घेतली असता चंद्रपूर शहरात एकुण १५ हॉटेल / लॉजेस यांनी नोंदणीकृत मालकांच्या कोणत्याही व्यावसायिक संबंधाशिवाय / संमतीशिवाय खोटे ट्रेडमार्क OYO ब्रॉण्ड व लोगो चा गैरवापर करुन ओयो बौध्दिक संपदा आणि भांडवली, गुंतवणुक बेकायदेशीरपणे वापरत आहेत. त्यांनी ओयो ब्रेडिंगचा गैरवापर केला आहे ज्यामध्ये त्यांचा ओयो लोगो, डिझाईन घटक, कलाकृती आणि दर्शनी भागाचा समावेश आहे. ज्यामुळे ओयोच्या प्रतिष्ठेला मोठे नुकसान झाले आहे.

तक्रारीत दिलेले हॉटेल/लॉजेस ची नांवे :- 

(1) Hotel Royal Inn - Ballarpur Road, Chandrapur

(2) Hotel Dream Stay - Ashtabhuja, Chandrapur

(3) Hotel Friends Stay - Ballarpur Road, Chandrapur

(4) Leo Star Hotel -Ashtabhuja ward, Chandrapur

(5) Hotel RR Inn Babupeth, Chandrapur

(6) Hotel Sky Line - Ashtabhuja ward, Chandrapur

(7) Hotel Ashoka Lodging and Boarding - Babupeth, Chandrapur

(8) Hotel I K Residency - Vikas Nagar, Chandrapur

(9) Hotel 3 Star Babupeth, Chandrapur

(10) Hotel Celebrity - Babupeth, Chandrapur

(11) Hotel Green Park - Babupeth, Chandrapur

(12) Hotel 7 Day - Mahakali Mandir Road, Chandrapur

(13) Hotel Sunrise - Jatpura Gate, Chandrapur

(14) Rayan Hotel & Celebration - Vichoda, Chandrapur

(15) Hotel Flagship Inn - Near Janta College, Chandrapur

अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ३४५(३), ३४७(१) भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम १०३, १०४ ट्रेड मार्क अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कारवाई  मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. चंद्रपूर शहर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांनी केली असुन गुन्हयाच्या तपासात मध्यरात्रौ पर्यंत पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीतील ७ ते ८ हॉटेल/लॉजेस वर चंद्रपूर शहर पोलीसांनी धाडी टाकुन आवश्यक कारवाई करीत असुन पो.स्टे. चंद्रपूर शहर सिमे बाहेरच्या हॉटेल / लॉजेस ची तपासणी व कारवाई करण्यात येत असुन गुन्हयाचा सखोल तपास सुरु आहे.




Post a Comment

0 Comments