आज शनिवारी राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले चंद्रपूरात.

 




आज शनिवारी राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले चंद्रपूरात.

◾देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राहणार उपस्थित.


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर मतदारसंघात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शनिवारी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये राज्याचे बांधकाम विभागमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. ते सकाळी ९ वाजता नागपूरमार्गे चंद्रपूरात पोहोचणार आहेत.

२८ तारखेला राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाजवळ जलाभिषेक व रुद्राभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथेही उद्या सकाळी १०.३० वाजता मंत्री भोसले भेट देत शिवलिंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ११ वाजता ते माता महाकाली मंदिर येथे जाऊन मातेचे दर्शन घेतील.

११.३० वाजता शिवाजी चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटन मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता बालाजी सभागृह येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास ते संबोधित करतील. याच ठिकाणी रक्तदान शिबिर, मंडळ अध्यक्षांना संगणक वितरण आणि पक्षप्रवेश कार्यक्रमही पार पडणार आहेत.




Post a Comment

0 Comments