राजूरा तालुक्यातील गोवरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बंधाऱ्यात अडकला कचरा
◾गावाकऱ्यांच्या मदतीने विशेष निधी खर्च करून बधारा केला साफ
◾पाटबंधारे विभागाला ग्राम पंचायतीचे आधीच निवेदन
◾स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी ग्रामपंचायतीवर खोटे आरोप- सरपंच गोवरी
राजूरा,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजूरा तालुक्यातील गोवरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बधारा अतिवृस्थिमुळे दरवर्षी ओसंडून वाहतो आणि परिणामता: आजूबाजूचा कचरा लटकून रस्ता दरवर्षी जाम होतो.
यावर्षीच्या पावसामुळे बंधारा जाम झाला कारणाने गावातील नागरिकांना शेतात ये जा करणारा रस्ता बंद झाला होता. त्याचीच दखल घेत ग्राम पंचायत गोवरीच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन देत तात्काळ रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली.
त्याचाच परिणाम की पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. परंतु कार्यवाहीला उशीर होत असल्या कारणाने ग्राम पंचायत प्रशासनाने जे सी बी चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एक दिवस उशीर झाल्या कारणाने गावातील नागरिकांनी सरपंच गोवरी यांचेकडे विनंती केली की सदर पूल आम्ही मानवी सहकार्याने साफ करू त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी केली असता.
ग्राम पंचायतीच्या विशेष निधीतून तो मोबदला देण्याचे मान्य केले.
या सर्व प्रकारा नंतर गावातील माजी सभापती हे सादर मोक्यावर जाऊन राजकीय पोळी भाजण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासनावर आरोप लावून कुठलीही दाखल न घेतल्याची माहिती देतात हे चुकीचे असल्याचे सरपंच आशाताई बबन उरकुडे यांनी सांगितले.
ग्राम पंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक यांच्या संगणमताने विशेष निधी खर्च करून हा मार्ग मोकळा करण्यात आला.
भविष्यात सुद्धा याप्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाशी वेळोवेळी संपर्क करून अडचनी दूर करण्यासाठी विनंती केल्याचे सरपंच्यानी नमूद केले.
0 Comments