कपड्यांच्या मार्केटिंगद्वारे बेरोजगार लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून शेकडो तरुण-तरुणींना फसवणूक

 



कपड्यांच्या मार्केटिंगद्वारे बेरोजगार लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून शेकडो तरुण-तरुणींना फसवणूक

◾बेरोजगारांना नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप

◾पत्रकार परिषदेत कामगार जिल्हाध्यक्ष अंधेवार यांचे न्यायाचे आश्वासन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बाबुपेठच्या मराठा चौकात असलेल्या राजस्थानमधील ट्रेंडस्टिक व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कपड्यांच्या मार्केटिंगद्वारे लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून शेकडो तरुण-तरुणींना फसवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे संबंधित पीडित बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे, तर अशा कंपन्यांपासून सावध राहून स्वतःचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी सांगितले की, अनेक कंपन्या शहरात येत आहेत आणि लोकांना आमिष दाखवून फसवत आहेत. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील ट्रेंडस्टिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या २ वर्षांपासून शहरातील बाबुपेठ वॉर्डातील मराठा चौकात चालवली जात होती. गरजू बेरोजगार तरुणांना नोकरी देऊन आणि कपड्यांचे मार्केटिंग करून लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून त्यांना फसवले जात होते. 

सदर कंपनी प्रति व्यक्ती ११ हजार ते ४६ हजार रुपये आकारत असे आणि कमी दर्जाचे कपडे देऊन मार्केटिंग करून घेत असे. या कंपनीत काम करणारे शहरा बाहेरील तरुण स्वतःच्या खर्चाने किरायाने राहत असत. पीडित तरुणांना विकल्या गेलेल्या कपड्यांच्या संख्येनुसार किंवा कंपनीत जोडल्या गेलेल्या लोकांच्या संख्येनुसार कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कंपनी अधिका_यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून काही तरुणांनी त्यांच्या पालकांकडून कंपनीत भरती करण्यासाठी पैसे मागितले, तर काही कुटुंबातील सदस्यांनी नोकरी मिळण्याच्या आशेने त्यांच्या मुलांना पैसे देण्यासाठी त्यांचे मंगळसूत्र विकले आणि काहींनी त्यांच्या गाड्या विकल्या. 

परंतु कंपनी अधिका_यांच्या आश्वासनानुसार गेल्या २ वर्षांपासून तरुणांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत आणि संबंधित तरुणांची फसवणूक झाली आहे. संबंधित कंपनीत काम करणारे सर्व अधिकारी मध्य प्रदेशातील आहेत. या संदर्भात, पीडित तरुणांनी मनसे कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांना त्यांच्या त्रासाची कहाणी सांगितली. अंधेवार कंपनीच्या ठिकाणी गेले परंतु कंपनी बंद असल्याचे आढळले. अंधेवार कंपनी अधिका_यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिका_यांनी फोन बंद केला. या प्रकरणात, पीडित तरुणांना न्याय मिळेल असे आश्वासन अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला दिले आहे.




Post a Comment

0 Comments