रेल्वे फाटक च्या अपूर्ण पुलामुळे घुग्घुसवासी महिला संतप्त; सर्व्हिस रोडशिवाय पुलाचे बांधकाम सुरू

 








रेल्वे फाटक च्या अपूर्ण पुलामुळे घुग्घुसवासी महिला संतप्त; सर्व्हिस रोडशिवाय पुलाचे बांधकाम सुरू 

◾त्वरित काम सुरू न केल्यास 16 ऑगस्ट ला रेल रोको आंदोलन

◾पत्रकार परिषदेत घुग्घुसच्या सर्व महिलांचा इशारा

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : घुग्घुस मध्ये जी 39 रेल्वे गेट आणि अपूर्ण रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे रेलवे गेट वर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे काही प्रकारचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

 शहरवासीयांसाठी कोणत्याही सर्व्हिस रोडशिवाय रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुलाचे बांधकामात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, माला मेश्राम आणि घुग्घुस च्या सर्व महिलांनी पुलाचे बांधकाम लवकर सुरू केले नाही तर 16 ऑगस्ट ला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रपरीषदेत दिला आहे.

गेल्या 3 वर्षांपासून जी-39  रेल्वे गेट वारंवार आणि दीर्घकाळ बंद राहिल्याने आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. या समस्येमुळे मुलांचे शिक्षण, रुग्णांवर उपचार, महिलांची सुरक्षितता आणि सामान्य जीवनावर वाईट परिणाम होत आहे. सतत वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय या भागात होत आहे.

जी-39 रेल्वे गेट दिवसातून अनेक वेळा बंद राहते, त्यामुळे रुग्णवाहिका, स्कूल बस, जड ट्रक आणि अत्यावश्यक सेवा ठप्प होतात. जड ट्रकांमुळे गेटवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. जड वाहतुकीमुळे लहान वाहनेही त्यात अडकतात. यातुनच 12 जुलै ला एक अपघातात गर्भवती महिला आणि बाळाला जीव गमवावा लागला. गेल्या 3-4 वर्षांपासून नवीन रेल्वे पूल अपूर्ण आहे, त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण जुन्या रेल्वे फाटकावर आहे. या समस्येवर 3 ऑगस्ट रोजी महिलांनी आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाबाबत घुग्घुस पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये जनरल रेल्वे अधिकारी डीजीएम सिव्हिल पी. श्रीकांत, वेकोली अधिकारी टिपले, रेल्वे संरक्षण दलाचे अधिकारी बलवीर सिंग, पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत, रेल्वे विभागाचे अधिकारी विकास प्रसाद, आंदोलक माला मेश्राम, संजय तिवारी, साजन गोहणे आणि इतर कामगार उपस्थित होते. 

बैठकीत पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्याने उपाययोजना कराव्यात, राजीव रतन चौकात 24 तास पोलिस नियुक्त करावे, राजीव रतन चौकातील खड्डे तातडीने भरावे, जड वाहतुकीच्या वेळेचे नियोजन करावे अशा मागण्या करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी  बैठकीत काम 15 दिवसांत पूर्ण होईल असे लेखी आश्वासन दिल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. अधिकाऱ्यांची आश्वासनामुळे 3 ऑगस्टचे रास्ता रोको आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. जर 15 दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर 16 ऑगस्ट रोजी घुग्घुसच्या सर्व महिलां द्वारे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

पत्रपरिषदेत माला मेश्राम, सुरेखा भोयर, उज्वला उईके, अनिता कोल्हे, अलका चुनारकर, भारती निमसटकर आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments