आरक्षण वर्गीकरण लाभ वंचित समूहाचे मुंबई येथे १० जुलैला महाएल्गार आंदोलन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने येत्या १० जुलै ला मुंबई येथील आझाद मैदानात आरक्षण वर्गीकरण लाभ वंचित समूहाचे येत्या १० जुलै रोजी महाएल्गार आंदोलनाचेआयोजन केले गेले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व मादगी समाज संघटनाचे प्रदेशाध्यक्ष तथा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती संघटनेचे संयोजक प्रा. हरिश्चंद्र भानू नक्कलवार हे करीत असून या मोर्चात मादगी,मादीगा, मातंग, मांग, गारुडी, बुरु ड, होलार, मेहतर, ढोर, चर्मकार, खाटीक, मोची यासारख्या अनेक संघटना आपल्या न्याय हक्कासाठी सहभागी होणार आहे. या मोर्चात न्याय हक्कासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी मादगी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे संयोजक प्रा. हरीचंद्र नक्कलवार व लोकस्वराज आंदोलनाचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केले आहे.
0 Comments