भूखंड विक्री प्रकरणात ५८ भूखंडधारकांची फसवणूक

 




भूखंड विक्री प्रकरणात ५८ भूखंडधारकांची फसवणूक

◾तक्रार असूनही संबंधितांवर कारवाई नाही

◾गोकुळ वासाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : वडगाव प्रभागात ८१/१ आणि ८१/२ लेआउटमध्ये १.८७ हेक्टर आर जमिनीचे ५८ भूखंड विकले गेले, त्यापैकी ४० भूखंडांचा फेरफार करण्यात आला. परंतु २००२ पासून १८ भूखंडांचा फेरफार न झाल्यामुळे महसूल विभागाकडे ही ०.८० हेक्टर जमीन रिकामी दाखवण्यात आली आहे. 

त्यामुळे या जमिनीवर ९ मीटरचे दोन रस्ते आणि ६ मीटरचा एक रस्ता दाखविण्यात आला आहे. हे सर्व माहित असुनही बाजीराव खोकले यांनी ०.८० हेक्टर जमीन रवी लोणकर यांना विकली आणि कोणतीही माहिती न घेता ती जमीन खरेदी केल्याने ५८ भूखंडधारकांची जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाली असल्याची माहिती गोकुळ वासाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

त्यांनी सांगितले की, बाजीराव संभाजी खोकले आणि रवी लोणकर यांनी वडगाव वॉर्ड क्रमांक ५४ मधील सर्व्हे क्रमांक ८१/१ आणि ८१/२ ची 80 हेक्टर आर जमीन रस्ता सहीत पुन्हा विक्री करून ५८ प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे. प्रशासन आणि रामनगर पोलिसांना याची माहिती देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. १९९४ पासून रजिस्ट्री आणि नोटरीद्वारे विक्री करून लेआउटमधील प्लॉटधारकांनी पक्की घरे बांधली आहेत आणि तिथे राहत आहेत. या लेआउटमध्ये बाजीराव खोकले यांच्याकडे कोणतीही जमीन नसतानाही, त्यांनी रवी लोणकर यांना ०.८० हेक्टर जमीन विकली आहे. यामुळे लेआउटमधील ५८ प्लॉटधारकांची फसवणूक झाली आहे. यामुळे इतर प्लॉटधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात ५८ प्लॉटधारकांनी रामनगर पोलिस स्टेशन, तहसीलदार, तलाठी आणि जिल्हा दंडाधिकाधिकारी शी पत्रव्यवहार केला. संबंधित ठिकाणी चौकशी केल्यानंतर तहसीलदार आणि तलाठी यांनी आदेश दिले की कोणतीही जमीन शिल्लक नाही. हे माहीत असूनही, मूळ मालक बाजीराव खोकले यांनी रिकामी जमीन भूखंडधारकाचा भूखंड म्हणून विकली. एकूण १८ भूखंडधारकांची नावे महसूल विभागात नोंदणीकृत नसल्याने खोकले यांनी १८ भूखंडधारकांचे भूखंड रवी लोणकर यांना विकले. त्यामुळे ५८ भूखंडधारकांची फसवणूक झाल्याची माहिती वासाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात त्यांनी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे आवाहन पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.




Post a Comment

0 Comments