सोन्या-चांदीचे दागीने व रोख असा एकुण 2,50,100/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
◾भद्रावती येथील दोन घरफोडीचे गुन्हे उघड एक आरोपी अटक
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : भद्रावती शहरातील सूर्य मंदिर वॉर्डात घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली असून, त्याच्याकडून पूर्वीच्या दोन घरफोड्यांचीही कबुली मिळाली आहे.
भद्रावती पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर दिनांक 23/07/2025 रोजी माहिती मिळाली की, सुर्यमंदीर वार्ड भद्रावती येथे एक इसम हा घराचा ताल तोडुन घरात प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा माहिती मिळताच भद्रावती पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचुन सुर्यमंदीर वार्ड भद्रावती येथील गोवर्धन पांडे यांचे घरात संशयीतास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारणा केली असता त्याने आपले नाव प्रमोद उर्फ मोबाईल अरुण गेडाम वय 32 वर्ष रा. रासा घोंसा भद्रावती असे सांगुन त्याने पोलीस स्टेशन भद्रावती अप.क्र.433/2024 आणि अपराध क्रमांक 336/2025 कलम 331 (3), 331 (4), 305 (अ) भारतीय न्याय संहिता चे दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हयातील चोरीचा माल सोन्या-चांदीचे दागीने व रोख असा एकुण 2,50,100/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे सदर आरोपी कडुन वरील दोन गुन्हयासह सुर्यमंदीर वार्ड येथील घरफोडीचा गुन्हा सुध्दा उघडकीस आला असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली भद्रावती ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात सपोनि विरेंद्र केदारे, पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पोअं खुशाल कावळे, योगेश घाटोळे, भुषण चौधरी सर्व पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली.
0 Comments