एक पेड माँ के नाम 2.0 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मनपातर्फे वृक्षारोपण अभियान
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. याप्रसंगी रोपट्यांची लागवड करण्यात आली.
शासनातर्फे "एक पेड माँ के नाम 2.0" तसेच "माझी वसुंधरा" अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि हरित आवरणात वाढ करून भावी पिढ्यांसाठी सुदृढ पर्यावरणाची जपणूक करणे आहे.उपरोक्त उपक्रमाअंतर्गत महापालिका प्रशासन, अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे. राष्ट्रीय मोहिमांच्या अनुषंगाने मनपातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात असून जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.
याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी उपस्थितांना झाडे जगवण्याची जबाबदार ही परिसरातील नागरिकांची असल्याचे सांगितले.यापूर्वी बल्लारपूर रोडवर लावलेली झाडे नागरिकांच्या सहकार्याने जगली आहेत. शहराला जवळपास २ लक्ष वृक्षांची आवश्यकता आहे,यातील ५० हजार वृक्ष लावण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे.एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता मनपा राबवित असुन या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे.
कार्यक्रमात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,हुज्जाज ए इकरा मल्टिपर्पज सोसायटी,इको प्रो संस्था तसेच मनपा अधिकारी कर्मचारी व इतर सामाजिक संस्थेची प्रतिनिधी उपस्थीत होते.
0 Comments