मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा 22 जुलै रोजी गुणगौरव सोहळा

 


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा 22 जुलै रोजी गुणगौरव सोहळा

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपुरातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे.

                दि. 22 जुलै 2025 रोजी सायं. 04.00 वाजता चंद्रपूरातील कन्यका मंदिर सभागृहात आयोजित या गुणगौरव सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

                सदर कार्यक्रमास अन्य मान्यवर अतिथींसह भाजपा महानगर पदाधिकारी, माजी नगरसेवक, भाजपाचे मंडळ अध्यक्ष, विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यगण, भाजपा कार्यकर्ते तथा पालक वर्ग उपस्थित राहणार आहेत. या गुणवंत सन्मान सोहळ्यास शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक रघुवीर अहीर यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments