डॉ. बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा

 









डॉ. बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा

◾हंसराज अहीरांची महामानवास आदरांजली

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुत्व वृध्दिगत करण्याकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यांनी विषमतेविरूध्द दिलेला लढा हा ऐतिहासिक होता. त्यांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज आपणा सर्वांना अनेक अधिकार बहाल झाले असून या घटनात्मक अधिकारांनीच बहुजन समाजाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व अन्य क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. एवढेच नव्हे तर आपला देश सुध्दा संविधानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा स्विकारून सर्वांनी राष्ट्राच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये योगदान देणे हीच या महान राष्ट्रपुरूषास खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

डॉ. बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंती पर्वावर हंसराज अहीर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नमन केले. त्यांच्या राष्ट्रीय योगदानाचे स्मरण करून आदरांजली अर्पण केली. या अभिवादन कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विठ्ठल डुकरे, रवि गुरनुले, राजु येले, डॉ. शरद रणदिवे, राजु अडपेवार, राजु घरोटे, प्रमोद शास्त्रकार, प्रदीप किरमे, संजय खनके, हंसराज रायपुरे, पुष्पा उराडे, शितल गुरनुले, कल्पना बबुलकर, शिलाताई चव्हाण, सुप्रिया सरकार, श्रीकांत भोयर, विकास खटी, गौतम यादव, पुनम तिवारी, स्वप्निल मुन, संजय मिसलवार, रविंद्र मुन, संदीप देशपांडे, तुषार मोहुर्ले, रवि लोनकर, अतुल रायकुंडलिया, राहुल सुर्यवंशी, मधुकर राऊत, राज कुमार, सुदामा यादव यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments