प्रशांत विघ्नेश्वर यांची ZRUCC-Central Railway Member झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती

 




प्रशांत विघ्नेश्वर यांची ZRUCC-Central Railway Member झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती

◾मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती सदस्य ( ZRUCC-Central Railway Member Post Appointment )


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा रेल्वेयात्री असोसिएशन,बल्लारशाह(बल्लारपूर)चे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती सदस्य ( ZRUCC Member ) म्हणून नियुक्ती झाली आहे.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या शिफारशीची दखल घेत. मध्य रेल्वेचे उपमहाप्रबंधक पीयूष कांत चतुर्वेदी यांनी ,प्रशांत विघ्नेश्वर यांच्या समिती सदस्यपदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. ZRUCC-Central Railway Member Post Appointment

जानेवारी 2025 पर्यंत  विघ्नेश्वर हे समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत. विघ्नेश्वर हे चंद्रपूर येथे दै.नवराष्ट्र या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.यापूर्वी प्रशांत विघ्नेश्वर यांच्याकडे तरुण भारत वर्धा जिल्हा प्रतिनिधी - सन 2008 - 2010, दै. लोकशाही वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 2010 - 2018, दै. देशोन्नती ब्रँच मॅनेजर चंद्रपूर जिल्हा 2018 - 2019, भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख 2015 ते 2020 जबाबदारी होती.

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर (2014) हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांचा पत्रकारिता व सामाजिक कार्याचा अनुभव मोठा आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्या मित्र परिवारांनी आनंद व्यक्त केला आहे.



Post a Comment

0 Comments