बस आणि दूचाकीच्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वरांचा जगीच मृत्यू



बस आणि दूचाकीच्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वरांचा जगीच मृत्यू


राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा - गडचांदूर मार्गावर बस आणि दूचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी चालक व त्याचा मागे बसलेले इसमाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना  मंगळवार 2  मे ला सायंकाळी 6  वाजता सुमारास घडली.

 मिळलेल्या माहितीनुसार पांढरपौनी जवळ बस आणि दूचाकीच्या भीषण अपघात झाला, या अपघातात दोघांचा जगीच मृत्यू झाला. संदीप सिंह वय ( 31 ) वर्ष  व त्याच्या सहकारी दुचाकीने पांढरपौनी येते परत येत असताना राजूरा येथुन पालगाव कडे जाणाऱ्या बस क्रमांक. MH 07 C 9538 या बसच्या जोरदार धडके दोन्ही दुचाकीस्वरांचा जगीच मृत्यू झाला.  

बस पुढे अचानक दुचाकी असल्याने बस चालकाने दुचाकीस्वारांना  वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी थेट बस खाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातात बस चालकाने प्रसंगावधन दाखविण्याचा  प्रयत्न करीत ब्रेक मारला मात्र बस रस्त्याच्या खाली उतरला नाल्यात धडकली, बस मधील सर्व प्रवासी सुरक्षित होते मात्र दुचाकी स्वार जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळतात पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचत  मृतदेहाला बाहेर काढले, दुचाकी स्वारांचे मृतदेह राजुरा रुग्णालय पाठवण्यात आले.



Post a Comment

0 Comments