केसीआरच्या भारत राष्ट्र समिती ( BRS ) पक्षात माजी आमदार श्री.चरण वाघमारे व इतर शेकडो दिग्गज नेत्यांचा जाहीर प्रवेश.





केसीआरच्या भारत राष्ट्र समिती ( BRS ) पक्षात माजी आमदार श्री.चरण वाघमारे व इतर शेकडो दिग्गज नेत्यांचा जाहीर प्रवेश.

◾भारत राष्ट्र समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा चे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखर राव  यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भातील शेकडो नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश.



हैदराबाद ( राज्य रिपोर्टर ) : तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस ( भारत राष्ट्र समिति BRS ) पक्षात प्रवेश. केसीआर यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी अनेक कार्यकत्यांसह प्रवेश सोहळा पार पडला. 

 तुमसर विधानसभा मतदान संघाचे भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस ( भारत राष्ट्र समिती BRS ) मध्ये पक्षात प्रवेश केला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष प्रवेश केल्याचे वाघमारे म्हटले आहे. 


भारत राष्ट्र समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा चे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या सर्वांगीण तेलंगणा विकासाच्या पॅटर्न वर प्रभावित होऊन  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व विदर्भातील शेकडो नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा हैद्राबाद येथे मा. के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश झाला. यामध्ये विदर्भ समन्वयक प्रा. श्री. ज्ञानेश वाकूडकर,  तुमसर विधानसभा मतदान संघाचे  माजी आमदार श्री. चरण वाघमारे, श्री. हरीशचंद्र बंधाटे, डॉ. युवराज जमाईवार, राजेश पटले, मेहबत सिंग ठाकूर,राजू गायधने,गुरुदेव बोन्डे,चंदू पिल्लारे, जगदीश उके, तसेंच माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व इतर दिग्गज नेते समाविष्ट होते. यावेळी भारत राष्ट्र समिती चे आमदार श्री. जीवन रेड्डी, श्री. बालका सुमन, माजी आमदार श्री. शंकर अण्णा धोंडगे, भारत राष्ट्र किसान समिती चे प्रदेशाध्यक्ष श्री. माणिक कदम, व भारत राष्ट्र समिती चे इतर नेते उपस्थित होते.


 तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे व बल्लारपूर तालुका येथिल बीआरएस ( BRS ) पक्षात प्रवेश केले आहे.   बल्लारपूर तालुक्याचे लक्ष्मण कनकुटला, धर्मा तगरम, राजू गालपेल्ली, प्रशांत गद्दला, प्रभुदास तांड्रा, निशांत आत्राम, सुनील कालवाला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखरराव यांचा उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षात प्रवेश केले असे जाहीर केले आहे.



Post a Comment

0 Comments