पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 'मन की बात'च्या शंभराव्या भागाचे यांचा देशवासियांसोबत अमेरिकेतील न्यू जर्सीमध्येही होणार प्रसारण
◾'मन की बात' राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रसारण होणार.
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'चा १०० वा भाग रविवार ३० एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. या भागाचे प्रसारण संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा देशवासियांसोबत ऐतिहासिक शतकीय संवाद ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दि. 30 एप्रिल, 2023 रविवार रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते व सामान्य नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती प्रार्थनिय आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
बिल गेट्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, आरोग्य, स्वच्छता अशा विविध मुद्द्यांवर विकासाच्या क्षेत्रात जागरूक केले आहे.'
UN ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज व्हा. PM मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा १०० वा भाग देखील @UN मुख्यालयातील विश्वस्त परिषद चेंबरमध्ये थेट प्रसारित केला जाईल.'
मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवार, 30 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजता न्यूयॉर्कमध्ये थेट प्रसारित केला जाईल. न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास, एका समुदाय संस्थेच्या सहकार्याने रविवार, ३० एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता न्यू जर्सीमधील भारतीय-अमेरिकन आणि प्रवासी समुदायासाठी कार्यक्रम आयोजित करेल.'
रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान मोदीजी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशाला संबोधित करतात. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी मन की बात कार्यक्रमास प्रारंभ झाला होता.२२ भारतीय भाषा, २९ बोली भाषा आणि ११ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अनेक प्लॅटफॉर्मद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.
0 Comments