बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात उलगुलान संघटनेचे आंदोलन
◾१० मार्चला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे राजू झोडे यांचे आवाहन
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटिन्स व खर्डा फॅक्टरीच्या दूषित व केमिकल युक्त पाण्यामुळे आसपासच्या शेतीला व जनावरांना धोका झाला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे उलगुलान संघटनेचे येत्या १० मार्चला राजू झोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
बामणी प्रोटीन्स व खर्डा फॅक्टरीचे दूषित पाणी नाल्याच्या प्रवाहात वाहत असल्याने आजूबाजूच्या शेतीला तेथील जनावरांना प्रदूषणाच्या संकटाचा सामना करावा लागत असून शेतीची मोठी नुकसान होत असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत प्रशासनाला प्रदूषण दूर करून समस्या सोडवाव्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा गंभीर इशारा दिला होता. परंतु सदर मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या १० मार्च २०२३ ला राजू झोडे यांच्या नेतृत्वात बामणी चौक, बल्लारपूर येथे प्रदूषणाविरोधात ठीक सकाळी ११.००वाजता आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तरी सदर आंदोलनास मोठ्या संख्येने उलगुलान संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी येण्याचे करावे असे आवाहन राजू झोडे यांनी केले आहे.





0 Comments