बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीत ( मुस्लिम ) नुरानी कब्रस्थानच्या भिंतिकरिता 5 लक्ष रूपये निधी मंजूर
◾मुस्लिम बांधवांनी मानले ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार चे आभार
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : विसापूर ग्रामपंचायत हद्दीत ( मुस्लीम ) नुरानी कब्रस्थान येथे सुरक्षा भिंत नसल्यामुळे येथील कबरी वरती जनावरे अनेक प्राणी नेहमी कबरी वरून आवागमन करायचे ही बाब विसापुर येथील भाजपा तालुका अध्यक्ष श्री. किशोर भाऊ पांदीलवर यांच्या लक्ष्यात मुस्लिम बाधवांनी आणून दिली, त्याकरिता सन २०१७ रोजी मुस्लीम कब्रस्थान, विसापूर करीता सुरक्षा भिंत सुमारे ३०० मीटर ची आवश्यकता होती त्याकरिता श्री. किशोरभाऊ पंदिलवार यांनी त्वरित जिल्हा परीषद चंद्रपूर ला संपर्क करून अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र मधील १० लक्ष रुपयाचा निधी मिळण्याकरिता निवेदन सादर केले व ती निधी मुस्लीम कब्रस्थान, विसापूर च्या नावे मंजूर करून दिली.
या निधी मधून सुमारे २०० मीटर काम झाले. सरकार बद्दल्यामुळे उर्वरित काम निधी अभावी बंद पडले , परत सन २०२२ रोजी श्री. किशोर पंदिलवार यांच्या पुढाकाराने उर्वरित कामा करिता ५ लक्ष रुपये चा निधी मंजूर करण्यात आला या कामा करिता मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व श्री. किशोरभाऊ पंदिलवार, भाजपा नेते तथा भाजपा तालुका अध्यक्ष यांनी जातीने लक्ष घालून निधी मंजूर करून दिल्याबद्दल विसापूर येथील मुस्लीम बांधव तथा हाजी फरीद मेहताब शेख ( अध्यक्ष नुरानी कब्रस्थान,विसापुर ) कमिटी यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले.





0 Comments