पुण्यस्मरण दिनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांना आदरांजली

 



पुण्यस्मरण दिनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांना  आदरांजली  


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  आधुनिक भारताचे भूषण, स्वातंत्र्ययोध्दा व साहित्यकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर महानगरातील पोलिस मुख्यालयासमोरील सावरकर चैकातील सावरकर स्मृती भित्तीचित्र स्थळी दि 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यविरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. याप्रसंगी माजी महापौर अंजलीताई घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, युवा नेते भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मोहण चैधरी, राजू येले, विनोद शेरकी, मायाताई उईके, शिलाताई चव्हाण, वंदना संतोषवार, राजेंद्र तिवारी, धम्मप्रकाश भस्मे, रवि लोणकर,  गिरीष अणे, रत्नाकर जैन, सुरेश जुमडे, गुरुदास मंगल, रवि येनारकर, संजय जोशी, शैलेश इंगोले, मनोहर राऊत, प्रदिप किरमे, बी.बी. सिंह, गौतम यादव, संजय खनके, विशाल गिरी, सचिन संदुरकर, राहुल सुर्यवंशी, देवानंद साखरकर, चेतन पटेल, प्रियंका पुनवटकर, हिमांशू दहेकर, नंदू लभाने, भावेश पटेल यांचेसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी माजी महापौर अंजली घोटेकर, अनिल फुलझेले व रत्नाकर जैन यांनी सावरकरांच्या सामाजिक, राजकिय व साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. वर्तमान पिढ्यांनी सावरकरांचे साहित्य व त्यांच्या विचार संपदेचे मनन व चिंतन करुन राष्ट्राच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गिरीष अणे यांनी केले.



Post a Comment

0 Comments