दुचाकी चोरट्यांना शहर पोलिसांनी केली अटक करून दोन्ही मोटरसायकल जप्त
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 20 फेब्रुवारी रोजीच्या रात्रो ख्रिश्चन कॉलनी व हॉस्पिटल वार्डातून दोन दुचाकी वाहन चोरी गेल्याची घटना घडली शहर पोलिसांनी यात 2 दुचाकी चोरट्यांना अटक केली असून चोरलेल्या दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली आहे.
शहरातील ख्रिश्चन कॉलोनी मधील कायस शिरवार यांची सी बी झेड एम एच 34 वाय 1916 घरासमोर ठेवलेली रात्रो चोरीला गेली तर त्याच दिवशी 20 फेब्रुवारी ला हॉस्पिटल वार्डात राहणाऱ्या मनीष गुरनुले यांची बजाज डिस्कव्हर क्र एम एच 34 ए आर 3744 घरासमोरून रात्रोला चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे फिरवली असता 2 अज्ञात व्यक्ती विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात दुचाकी विकण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरी गेलेल्या दोन्ही मोटरसायकल आढळून आल्या यात सुलभ उर्फ कृष्ण पडगेलवार वय 20 वर्ष, रा. विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर व धर्मेंद्र खोब्रागडे वय 24 वर्ष रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर यांना अटक करून दोन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आली.
पुढील तपास नापोका संतोष पंडित व चेतन गज्जलवार करीत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पो अधीकारी सुधीर नंदनवार, तसेच पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि मंगेश भोंगाडे, पो कर्म. सफौ शरीफ शेख, पो हवा महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, नापोशि चेतन गज्जलवार, सचीन बोरकर, संतोष पंडीत पोशि, दिलीप कुसराम, इरशाद खॉन, इम्रान खॉन, रूपेश रणदिवे सर्व गुन्हे शोध पथक पो स्टे चंद्रपुर शहर यांनी केली आहे.





0 Comments