श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी विद्यार्थी आणि शिक्षक मेळावा
◾सन 1995-96 पासूनचे माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक, यांचा सत्कार
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : रविवार दिनांक 19 फेब्रुवारी ला शाळेच्या भव्य पटांगण्यात घेण्यात आला . सन 1995-96 पासूनचे माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्य मुळे त्यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राजेश बट्टे, वर्षा मस्की (ठाकरे) आणि प्रास्ताविक अरविंद घुंगरूटकर आभार प्रदर्शन अविनाश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील प्राचार्य अनिता पंधरे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे मार्गदर्शक माजी प्राचार्य श्रीधर फटाले, मनोहर बनसुले, शैला फटाले, बितिका सरकार, दीपिका सरकार होत्या. शाळेतील पर्यवेक्षक सघंपाल रामटेके, उर्मिला सुर्तीकर, जोत्सना रागीट, अरविंद घुंगरूळकर, संजय कागदलवार, अविनाश मुमुडवार सर इत्यादी शिक्षकांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थी मध्ये एड. युवराज धानोरकर, प्रेमदीप नगराळे, पुरुषोत्तम लांडे, ताराचंद वाढई, ईंद्रजित गेडाम, विशाल बल्लावार, अशोक गेडाम, प्रदीप नगराळे, अमित करमनकर, मनोज भोयर, कपिल वरारकर, मंगेश मोरे, अतिश साळवे, धिरज जिवतोडे, वैभव बोंनगींवार, दिलीप काटोले, खानोरकर, राजू सोनटक्के, संदीप जाधव, सुनील चापले, हितेश दवंडे, भास्कर घुंगरूटकर, नितेश परसुटकर, राजेश टोंगे, विक्रम सुरतीकरओंकार लांडे, श्रीगणेश गेडाम, छाया ननावरे, माधुरी धोंगळे, पिंकी डेरकर, चैताली गिरसावडे, ओम कपारे, स्वप्निल बोरकर, शकील खान, संतोष श्रीरामे, अभिषेक टिपले, राजेश्वर करवटकर, प्रेमदीप नगराळे, गुणवंत साळवे, महेंद्र पवार, ताराचंद वाडई, योगेश बनवाडे, आशिष बट्टे, रुपेश चांदेकर इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपले विद्यार्थीपणाच्या अनुभव सांगितले, आजी माजी सोबत असलेले सर्व मित्रपरिवार एवढ्या वर्षांनतर भेटल्यामुळे भावुक झाले, आणि शाळेबद्दल आभार व्यक्त केले. असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाल्यामुळे दरवर्षी घ्यावा असे माजी विद्यार्थ्यांनी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनत घेतली.







0 Comments