युवापिढीने शिवाजी महाराजांच्या इतिहासातून स्फुर्ती घेत राष्ट्र विकासात योगदान द्यावे - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य रयतेचे होते, सर्वांच्या भल्याचे होते. त्यांच्या राज्यात माता भगिनींचा आदर व्हायचा त्यांच्या संरक्षणासाठी कायदे होते. महीलांवरील अन्याय, अत्याचाराविरुध्द कठोर शासन केले जायचे. आपल्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणारा महाराजांचा राज्यकारभार होता. गणीमी काव्याव्दारा मुगलांना धडा शिकविणारे राजे म्हणुन महाराजांचा अखिल विश्वात लौकीक आहे. ते सर्वत्र पुज्यनीय व्यक्तीत्व असल्याने त्यांच्या जयंतीदिनी छत्रपतींच्या कार्याचा, विचारांचा, शौर्याचा वारसा जपतांनाच राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्यास युवापिढीने स्वतःमध्ये बदल घडवून आणावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शिवजयंती उत्सव सोहळा प्रसंगी केले.
जगदंब शिव सार्वजनिक उत्सव समिती व श्रीमंतयोगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन श्यामनगर चंद्रपूर च्या वतीने दि. 19 फेब्रुवारी, 2023 रोजी श्यामनगर स्थित भगतसिंह चौकात आयोजित कार्यक्रमास ते संबोधित करत होते. या कार्यक्रमास भाजपा चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, माजी नगरसेविका जयश्री जुमडे, अॅड. सारीका संदुरकर, भाजपा ओबीसी मोर्चा चे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, दिनकर सोमलकर, राजेंद्र तिवारी, क्रिष्णा कुंडू, गुरुपद मंडल, दिलीप मंडल, अनुपकुमार यादव, अरुण मोहारे, कमलाकर कुळमेथे, सचिन संदुरकर, डॉ. मनोज कुपरणे, बळीराम शिंदे, आकाश मस्के, अनिकेत लाखे, उमेश नक्षिणे, दारासिंह डांगी, सोमेश्वर राऊत, ज्योती उगेमुगे, कुंदा राजगडे, हर्षा देवाळकर, पराग मलोडे, कमलाकर कुळमेथे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या संबोधनात पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबध्द लष्कर, सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणा, प्राचीन हिंदु परंपरेची जोपासना करण्यात प्राधान्य दिले. त्यामुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये महाराजांचा मोठा प्रभाव आहे. मराठी लोकांच्या अस्मितेचा ते अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे अशा महान योध्यांच्या इतिहासाचे वाचन व मनन करुन त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे कार्य युवापिढींच्या हातून घडल्यास महाराजांना हीच खरी आदरांजली ठरेल राज्यात व केंद्रात महाराजांच्या राज्यकारभाराशी अभिप्रेत असे कार्य होत आहे. सर्वांची साथ व सर्वांचा विकास या भुमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्य करित असल्याचेही अहीर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवर अतिथींनी छत्रपती महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.








0 Comments