शेती, उद्योग, रोजगार व सर्व घटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला 2023-24 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्प देशाला स्वयंपूर्ण व समृध्दतेच्या दिशेने नेणारा असून या अर्थसंकल्पातून शेतकरी, बेरोजगार, कामगार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, करदाते, महिला सशक्तीकरण व संपुर्ण घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.
सर्वच क्षेत्रात देशाची प्रगती साधणारा हा अर्थसंकल्प असल्याने जागतिक स्तरावर देशाची विकासाभिमुख प्रतिमा उजळून निघेल या अर्थसंकल्पात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे राष्ट्राभिमुख धोरणे तसेच दुरदृष्टीचा प्रभाव असून या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मापदंड निर्धारित करुन अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असल्याने देशाची प्रगतीच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल होणार आहे. देशातील सर्वच घटकांना न्याय देणारा, शेती, लघुउद्योग, स्वास्थ्य सेवा, शिक्षण, रोजगाराला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिक व नोकरदारांना दिलासा मिळाला असल्याने हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाला प्रगतीच्या दिशेने नेईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.






0 Comments