24 वे निसर्गोपचाराचे राष्ट्रीय अधिवेशनाचे औरंगाबाद येथे 3 व 4 फरवरी 2023 रोजी आयोजन.
उदगीर ( राज्य रिपोर्टर ) : हंस जा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद द्वारा संचलित रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन औरंगाबाद यांच्या वतीने दिनांक 3 व 4 फरवरी 2023 रोजी साखरे मंगल कार्यालय औरंगाबाद येथे संपन्न होणार असून या 24 व्या राष्ट्रीय अधिवेशनात च्या वेळी विविध विषयावर चर्चा होणार असून या निसर्गोपचार अधिवेशनात डॉ. राजेश मद्रे, डॉ. मनीषा गुरव, डॉ .एम.जे. शेख, डॉ. अमीर मुलानी, डॉ. विनोद कुमार यादव, डॉ.राकेश जिंदाल, डॉ.शिवन्ना शंकरय्या, डॉ. भाऊराव देशमुख, डॉ. मकबूल, डॉ. नवल जी मुळे, डॉ.लोकेश मुळे, डॉ. नारायण माढेकर, डॉ. लक्ष्मीकांत सावळे, डॉ. गोविंद जयस्वाल, डॉ. दिलीप मस्के, डॉ. रमाकांत जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. छाया रत्नपारखी चेअरमन औरंगाबाद संस्था पदाधिकारी डॉ. गिरीश सिलिंनकर सदस्य डॉ. प्रवीण सुवर्णकार, डॉ .चंद्रशेखर दैवज्ञ, डॉ. बालाजी सुवर्णकार यांच्यासह आदींनी केले आहे.






0 Comments