सुवर्णपदकाचे मानकरी Santosh Thipe Gold Medal is awarded संतोष थिपे ठरले राज्यशासनाच्या वनविभागाअंतर्गत कार्य करणार्या वनाधिकार्याना सन्मानित केले जाते. the Forest Department of the State Government.

  



सुवर्णपदकाचे मानकरी Santosh Thipe Gold Medal is awarded संतोष थिपे ठरले राज्यशासनाच्या वनविभागाअंतर्गत कार्य करणार्या वनाधिकार्याना सन्मानित केले जाते. the Forest Department of the State Government.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : वनसंपत्तीचे संरक्षक आणि संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या वन अधिकार्याना राज्य शासनातर्फे दरवर्षी सन्मानित केले जाते. सन 2019 - 20 यावर्षीच्या सुवर्णपदकाचे मानकरी मोहूली॔ बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राअधिकारी संतोष थिपे   ठरले. शुक्रवारला राज्य शासनाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

वनविभागात उत्कृष्ट सेवा देणार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी/उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी मुख्य वनसंरक्षक  शिफारस करतात. त्यासाठी संतोष थिपे संबंधित अधिकाऱ्यांचे चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, गुणवत्ता आदी बघितले जाते. थिपे यांनी यापूर्वी चंद्रपूर आणि बल्लारपूर वनपरिक्षेत्रात काम केले आहे. कर्तव्यावर असताना त्यांचावर बिबट्याने  हल्ला केला होता. तो त्यांनी धाडसाने परतवून लावला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पत्र पाठवून कौतुक केले होता. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच चर्चेत राहिले आहे.बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कार्यरत असतांना जनवन विकास योजनेअंतर्गत 50 युवकांना त्यांनी सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले. सोबतच ताडोबा मोहलीं वनपरिक्षेत्रातील 40 गाईडला त्यांनी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्यापासून बचाव करण्यासाठी वनपरिक्षेत्रा लगतच्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या सहकार्यातून वन्यप्राण्यांचे मुखवटे प्रदान करण्यात आले. याच त्यांच्या कार्याचे दखल वनखात्याने घेतली आणि त्यांना सुवर्णपदकाचे मानकरी ठरविले.



Post a Comment

0 Comments