नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar

 




नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई  – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे, अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा शारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

14 डिसेंबर रोजी मुल तालुक्‍यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकारसावली तालुक्‍यात बाबुराव कांबळे व 15 डिसेंबर रोजी खेडी येथे स्‍वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाला. त्‍याआधी 7 डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्‍ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाहीअसे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याबाबत त्‍यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्‍या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.





Post a Comment

0 Comments