कोरपना तालूक्यात ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांचा प्रचाराचा झंझावात

 





कोरपना तालूक्यात ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांचा प्रचाराचा झंझावात

 कोरपना तालुक्यातील गावांना भेटी

कोरपना ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यातील होत असलेल्या 10 ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सदर्शनजी निमकर यांनी कोरपना तालुक्यातील आदिवासीबहुल ग्रामपंचायतीचा दौरा केला. यांच्या सोबत प्रदिप बोबडे, प्रदेश सहसंयोजक भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश तथा विदर्भ अध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोबत उपस्थित होते.

         कोरपना तालुक्यातील येरगव्हाण, बोरगांव या गावांना भेटी दिल्या.  ग्रामपंचायत निवडणूक विषयावर स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून चर्चा केली, ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सोबतच विविध गावातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.

         या दौऱ्यामध्ये माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांच्या सोबत प्रदिप बोबडे,प्रदेश सहसंयोजक भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश तथा अध्यक्ष विदर्भ, भाजपा किसान मोर्चा, आदिवासी नेते माजी सरपंच अरुणभाऊ मडावी, दिनेश सुर, किशोर गौरकर, सुर्यभान जिवतोडे, गजानन आमने, देविदास पिंपळ्शेंडे, मुकेश नानचलवार, प्रकाश गौरकर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments