पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार ते सातारा तुकुम रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे

 



पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार ते सातारा तुकुम रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे

◾गावकऱ्यांची वंचितचे नेते राजू झोडे यांच्याकडे निकृष्ट रस्त्याबाबत तक्रार


पोंभूर्णा ( राज्य रिपोर्टर ) : पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार ते सातारा तुकुम येथील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्ता चांगला बनवण्याची मागणी वंचितचे नेते राजू झोडे यांनी केली.

         उमरी पोतदार ते सातारा तुकुम रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. सदर बांधकामात  रस्त्याच्या बाजूचीच मुरूम काढून टाकण्यात आलेली असून वरवर गीट्टीचा थर टाकलेला आहे. गावकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रार केली होती परंतु कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्याशी संपर्क करून त्यांना या रस्त्याबाबतची तक्रार सांगितली. तात्काळ राजू झोडे यांनी रस्त्याच्या कामावर येऊन पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु आहे असे त्यांना आढळले. त्यांनी या संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क केला असता टाळाटाळवीचे उत्तर देण्यात आली. लाखो रुपयाचे रस्ते निकृष्ट दर्जाचे बांधत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून जर तात्काळ रस्त्याच्या बांधकामात सुधारणा करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर याविरोधात वंचित बहुजन आघाडी तिव्र आंदोलन करेल असा इशारा गावकऱ्यांनी व राजु झोडे यांनी संबंधित शासन व प्रशासनाला दिला.

Post a Comment

0 Comments