पोलीस स्टेशनमध्ये चक्क नागराज अवतरले
◾पोलीस विभागात धावपळ
◾सर्पमित्राने शिताफीने नागराजाला पकडले
वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांच्या केबिनसमोर एक कुत्रा सतत भुकत असल्याने पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण नितनवरे यांनी केबिन समोर जाऊन बघितले असता साप असल्याचे आढळून आले. सदर सापाची लांबी ५ फूट असल्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. सदर घटनेची माहिती वर्धेचे प्राणीमित्र शुभम जळगावकर व महेश गिरपुंजे यांना देण्यात आली. दोघांनी सुद्धा अजिबात वेळ न करता तात्कळ घटनास्थळ गाठले. त्यांनी जाऊन बघितले असता सादर साप हा नाग जातीचा विषारी साप असल्याचे उपस्थितांना सांगितले. शहरी भागात नाग आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले. तर, चक्क पोलीस ठाण्यासारख्या गर्दीच्या ठिकणी सापडल्याने अधिकच आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर सापाची लांबी ५ फूट असून सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले. यावेळी, पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments