चंद्रपुरात अनैतिक देहव्यापार करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक !
◾एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ३ युवती यातून मुक्त झाल्या
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : तरुणींना मग त्या विवाहित असो वा अविवाहित देहविक्री, वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या, आमिष देणाऱ्या किंवा बरेचदा भूलथापा किंवा धमकी देऊन देहविक्री करायला भाग पाडणाऱ्या महिलाच असतात हे सुद्धा उघडकीस येत असते. असाच प्रकार चंद्रपूर येथील एका सामजिक संस्थेच्या जागरूकतेने उघडकीस आला असुन चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चोख कारवाईमुळे देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला बेड्या ठोकण्यात यश मिळाले तर तीन पीडित युवतींना देहव्यापाराच्या दलदलीतुन बाहेर काढण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एका सामाजिक संस्थेने पोलीस अधिक्षक अरविद साळवे व अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना एका ठिकाणी एक महिला तरुणींकडून आमिषाने देहविक्री करवून घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अरविंद साळवे ह्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कार्यवाही करण्याच्या सुचणा दिल्या. प्राप्त सूचनेनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांनी पथक तयार करून २३/०३/२०२२ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीत गौतम नगर, चंद्रपूर येथे डमी ग्राहकाहडुन खात्री करून धाड घालून देहव्याापारचे रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला अटक केेली व तिच्या तावडीत अडकलेल्या 3 पीडित युवतींची मुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार गृह चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले.
सदर कार्यवाहीत आरोपी महिलेचे विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध क्रमांक १४४/२०२२ कलम ३७० २७० (ए) २७९ भा.द.वी. सह कलम ३, ४, ५, ६ अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अभिनयम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, पो. हवा. स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नापोको सुधीर मत्ते, पो का प्रसाद, संदीप मुळे, प्रमोद कोटनाके, व पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील म.पो.हवा. विजया कटाईत, मनापोकॉ दिपली देवांग, वर्षा भगत, श्वेता डाहुले यांनी केली.
0 Comments