चंद्रपूर शहर हद्दीत गौतम नगर येथील अनैतीक देहव्यापार अडडयावर पोलिसांची कार्यवाही
◾स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने रेड कार्यवाही, परराज्यातील तीन पिडीत मुलींची सुटका
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्हयात एका ठिकाणी अनैतीक देहव्यापार चालु असल्याबाबत तक्रारी मा. पोलीस अधिक्षक अरविद साळवे यांना प्राप्त झाले होत्या. त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक सा. यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे सुचना देण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार केले. दि. २५/०९/२०२१ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीत गौतम नगर, चंद्रपूर येथे एक महिला अल्पवयीन मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेते अशा मिळालेल्या माहिती वरून सदर माहितीची बोगस ग्राहकाकडुन खात्री करून गौतम नगर, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने रेड कार्यवाही केली. असता त्या ठिकानी दोन स्त्रीया या परराज्यातील मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेताना मिळुन आल्याने त्यांना महिला पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून त्यांचे कडुन राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना या परराज्यातील तीन पिडीत मुलींची सुटका करुन त्यांना स्त्री आधार गृह चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाहीत दोन आरोपी महीला विरोधात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध कमाक ७५९/२०२१ कलम 370, 370 (ए), 371 भा.द.वी. सह कलम 3, 4, 5, 6, 7 अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम 1956, अन्वये गुन्हा नोद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे अधिकारी करीत आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मा. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. पुसाटे नियंत्रन कक्ष चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे,पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ.नितीन जाधव, पो.हवा.संजय आतकुलवार, ना.पो.कॉ.सुधीर मत्ते, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनी केली.











0 Comments