माजी नगरसेवक यांचेवर सत्तूरने प्राणघातक हल्ला

 


माजी नगरसेवक  यांचेवर सत्तूरने  प्राणघातक हल्ला                            

◾सत्तूरने वार केल्यामुळे विलास तूमाने प्रकृती पार गंभीर अवस्थेत

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) :   राजूरा नगरपरिषदेचे माजी सदस्य विलास तूमाने यांचेवर लगतच्या रामपूर परिसरात सत्तूरने हल्ला करण्यात आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे राजुरा परिसरात चर्चा सुरु आहे. सविस्तर वृत्त असे की माजी नगरसेवक विलास तूमाने यांचे लहान भाऊ राहुल यांची रामपूर परिसरात मास विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या शेजारीच दुर्गे इसमाचे सुद्धा दुकान असून त्यांच्याच बऱ्याच दिवसांपासून शुल्लक कारणावरून वाद सुरू आहेत मुख्य म्हणजे दोन्ही दुकानदार एकमेकांची शेजारी असून दोघांचीही घरे सुद्धा चुनाभट्टी या परिसरात लागूनच आहे. आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास राहुल यांच्या शेजारी दुकानदार यांची पुन्हा वाद झाला त्यामुळे राहुल यांनी विलास तूमाने याला दुकानात बोलावले. तिथे त्यांच्यात परत वाद झाला. दरम्यान दुर्गे नामक दुकानदाराने विलास तुमाने यांचेवर सत्तूरने सपासप वार केल्यामुळे त्याचा गाल कापल्या गेल्याची चर्चा असून सत्तूर चा वार गळ्यावर सुद्धा झालेला आहे. तर प्राप्त माहितीनुसार आरोपी दुर्गे बंधूंना सुद्धा दुखापत झाली असून त्यांना हातावर टाके घालण्यात आल्याचे समोर येत आहे. जखमी अवस्थेत असलेल्या माजी नगरसेवक विलास तूमाने यांना राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. खाजगी रुग्णालयांनी प्रकृती बघता शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने.जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments