महात्मा फुले महाविद्यालयात,बल्लारपूर मध्ये एन.सी.सी. भरती शिबिराचे आयोजन

 

महात्मा फुले महाविद्यालयात,बल्लारपूर मध्ये एन.सी.सी. भरती शिबिराचे आयोजन

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालया,बल्लारपूर मध्ये एनसीसी भरती शिबिराचे आयोजन करण्यात आले. 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा च्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल वि बी. भास्कर आणि प्रशासनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल गौस बेग यांच्या मार्गदर्शना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये गुरुनानक विज्ञान महाविद्यालय आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यातील एनसीसी घेऊ इच्छित असलेले अनुक्रमे 37 आणि 102 असे एकूण 139 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यात 28 मुलींची संख्या लक्षणीय होती.

      एनसीसी हे ग्रामीण तथा शहरी भागांतील विद्यार्थ्यांन मध्ये सेना तथा अर्ध सुरक्षा बला मध्ये भरती साठी विशेष आकर्षण आहे. एन. सी. सी. कॅडेट्स जे बी. आणि सी. सर्टिफिकेट धारी आहे अश्यांना भारतीय सेनेमध्ये विशेष जागा राखीव आहे. एनसीसी युवकांना देशसेवा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. 

        भरती शिबिरा साठी 21 महाराष्ट्र बटालियन च्या वतीने ट्रेनिंग जेसीओ सुभेदार भरत सिंग आणि शिपाई हवालदार सद्गुरु सिंग यांनी जबाबदारी पार पाडली. या भरती शिबिरामध्ये नवीन विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून नवीन एनसीसी कॅडेट ची निवड करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कल्याणी पटवर्धन यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. महेशचंद शर्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर प्राध्यापक योगेश टेकाडे यांनी भरती शिबिराची ची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सीनियर कॅडेटस् यांनी भरती शिबिराचे आयोजन तथा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान केले.







Post a Comment

0 Comments