बल्लारपूरात दुचाकी रॅली काढून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंद चे आवाहन - राष्ट्रवादी काँग्रेस
🔹शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस चे समर्थन
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : देशाची राजधानी दिल्ली व पंजाब राज्यात मागील अनेक महिन्यापासून शेतकरी बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी अविरतपणे आंदोलन करीत असतांना माय-बाप सरकारच्या कानावर जु सुद्धा चढत नाही की काय असा प्रश्न निर्माण होत आहे दिवसेंदिवस वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालले कोरोनाच्या जीवघेण्या आजाराशी लढा देत असतांना ही वाढत्या महागाई वर सुद्धा तोंड द्यावे लागते.
या सर्व बाबींचा विचार करून आज २७ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी बंद चे आवाहन करण्यात आले होते या बंदला देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. बल्लारपूर शहरात ही या बंदला प्रतिसाद मिळाला शेतकरी आंदोलन समर्थनार्थ बल्लारपूर शहरातील व्यापारी बांधवांनी सुद्धा आपले समर्थन देऊन काही वेळ आपली आस्थापने बंद ठेवली, बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढून शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले याकरिता तालुकाध्यक्ष बादल उराडे, उपाध्यक्ष आरिफ भाई, राकेश सोमाणी, अमर रहीकवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यानंतर बल्लारपूर तहसीलदार साहेब मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले यानुसार शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे, वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे, दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे त्यावर अंकुश आणावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या व तदनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.









0 Comments