खळबळजनक घटना : 5 प्रवासीसह बस यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळ पुराच्या पाण्यात वाहून गेली
◾5 प्रवासीसह बस वाहून गेली 2 प्रवासी टपावर तर 2 प्रवासी झाडावर लटकले असल्याची प्राथमिक माहिती
वृत्तसेवा : गुलाब चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असुन बर्याच ठिकाणी पूर अथवा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असुन शासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र तरीही प्रवाशांची ने-आण करण्यासाठी एस टी बस सुरू आहेत. मात्र प्रवाशांच्या जिवाची जबाबदारी असलेल्या बस चालकांनी जबाबदारीने व खबरदारी घेऊन प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळ नियंत्रण सुटल्याने एक बस 5 प्रवाशांसह वाहुन गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जोरदार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या जिवावर बेतला आहे. आज सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी वर असलेला दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. मात्र, त्यावेळीच बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चालक आणि वाहक बसमध्येच असल्याचे समजते. याबसमधील एका प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ५०१८ ही बस नांदेडहून पुसदमार्ग नागपूरला निघाली होती. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे. उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता त्यामुळे बस वाहुन गेली आहे. उमरखेड तहसीलदार व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबसच्या टपावर आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र चालकाच्या अतिआत्मविश्वासामुळे लोकांचा जीव धोक्यात गेला होता. या बस चालकावर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.









0 Comments