आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर 24 व 31 ऑक्टोम्बरला परीक्षा होण्याची शक्यता
🔹परीक्षेच्या ९ दिवसापूर्वी प्रवेशपत्र जाहीर होणार
जालना ( राज्य रिपोर्टर ) : आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता.( Health department exams will be held on 24 and 31 October ) आज जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी महाराष्ट्र आरोग्य विभागाची नवी तारीख जाहीर केली आहे. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.








0 Comments